राजेंद्र पाटील राऊत
नायगाव- मुगाव पाटीजवळ अपघातात दोन जण ठार अज्ञात वाहनाच्या धडकेत काल दिनांक 23 डिसेंबर रोजी दोन जण ठार झाले असून, नायगाव तालुक्यातील मुगाव पाटी जवळ ही घटना घडली. नायगाव तालुक्यातील धनज येथील दोन तरुण गोविंद शंकर भोसले वय 19, व पांडुरंग प्रकाश सूर्यवंशी व 24 हे दोघे ठार झाले असून, हे दोघेजण काल दिनांक 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रीच्या अकरा वाजेच्या दरम्यान नरसी ते मुखेड या रोडवरील मुगाव पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. ते बरेच वेळ रोडवर पडून होते कारण नांदेड जिल्ह्यात कडाक्याची थंडी असल्यामुळे रोडवर वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ही बातमी नायगाव पोलीस स्टेशनला समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ साहेब यांनी एक हवालदार घेऊन घटनास्थळी ताबडतोब जाऊन जखमींना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे आणण्यात आले. मात्र एकाचा मृत्यू झाला होता. व दुसरा नांदेड येथे उपचारासाठी नेले असता, उपचार चालू असताना त्याचा पण मृत्यू झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक पडवळ साहेब यांनी दिली. एकाचा कमरेखालील भागाचा चुराडा झाला होता तर दुसऱ्याचे डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघेही वाचू शकले नाहीत. या प्रकरणी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क देगलूर