Home राजकीय ग्रामपंचायत निवडणूकांचे गचाळ राजकारण त्यात गावकीचे पुढारपण

ग्रामपंचायत निवडणूकांचे गचाळ राजकारण त्यात गावकीचे पुढारपण

210

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत निवडणूकांचे गचाळ राजकारण त्यात गावकीचे पुढारपण
(राजेंद्र पाटील राऊत निवडणूक वार्तापत्र)
सध्या ग्रामपंंचायत निवडणूकांचा धुराळा उडतोय!सर्वत्र परवा बुधवार पासून हवश्या नवश्या गवश्यांची व गुडघ्याला बांधून तयार असलेल्यांची उमेदवारी फाँर्म भरण्यापासूनच रणधुमाळी रंगणार आहे!असे असले,तरी गावकीच्या राजकारणात उतरणारी पुढारपण करणारी मंडळी निश्चितच स्वच्छ चारीत्र्याची आहेत अस म्हणताच येणार नाही.बहुतेक गावागावात या राजकारणी पुढाऱ्यांनी यापुर्वीच आपआपल्या नातेवाईक व कुटूंबातील मंडळीना शासकीय जागावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे.ते या निमिताने निवडणूकीत उतरणा-यांना भोगावे लागणार आहे,त्याशिवाय उमेदवारी दाखल करताना अनेक जाचक अटी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आहेत.त्याचे पुरेपूर पालन करणाऱ्या व्यक्तीनाच उमेदवारी दाखल करता येणार आहे,काही ठिकाणी तर भयानक अवस्था आहे.गाव तस चांगल पण भामटयांनी नासवलं अशी स्थिती असतानाही गावामध्ये लाईट पाणी विकास कामाचा बोजवारा उडालेला असताना आणि गावच्या गाव अतिक्रमणाने गिळकृंत केलेली असताना व त्यावेळी याच पदावर असलेल्या सदस्यांनी स्वतःच्या आर्थिक तुंबडया भरण्यातच धन्यता मानल्याने त्याचे परिणाम आता भोगावेच लागतील अशी दृश्य सध्या तरी गावागावात बघावयास मिळत आहेत,वास्तविक ग्रामसेवकांनी देखील आता संपतीचा मालमतेचा उतारा उत्साही उमेदवारी दाखल करणाऱ्याना देण्यापुर्वीच त्याची मुळ मालकीची खरेदी खतावरील जागा किती?आणि वाढवून अतिक्रमण केलेली किती याचा स्पष्ट उल्लेख कागदपत्रामध्ये केला तर भविष्यातील अनर्थ निश्चितपणे टळू शकतो.त्यासाठी उद्या “युवा मराठा”न्युजच्या माध्यमातून जनहितार्थ मालेगांवचे गटविकास अधिकारी यांना एक निवेदन देण्यात येऊन,ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या उमेदवारांची खरेदीखतानुसार मुळ जागा किती?आणि सरकारी गावठाण ,गायरान,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रामपंचायत हद्दीतील किती जागावर अतिक्रमण केलेले आहे याचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश ग्रामसेवकांना काढण्यात यावेत अशी मागणी केली जाणार आहे,त्याशिवाय उत्साही व इच्छूक उमेदवारांना कागदपत्रच देण्यात येऊ नयेत असे ग्रामसेवकांना बंधनकारक करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.