हातकणंगले तालूक्यातील ऐतिहासिक पेठ वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात वडगांव प्रथमच आय.पी.एल.नंतर व्हि. पी.एल.भव्य असा वडगांव ” प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे.
आज सातव्या दिवशी सेमि फायनल साठी कुडाळकर विरूद्ध दुर्गुळे सनराइसझर्स यांच्यामधे होती .
नाने फेक कुडाळकर इलेवन ने जिंकून ८ षटकात ५९ धावा काढल्या.
दुर्गुळे संघाला आव्हान दिले होते.
हे आव्हान दुर्गुळे सनराइझर्स संघाने उत्कृष्ट रित्या पार केले . दुर्गुळे संघाने १ बाद, ४० बाँल मधे ६३ धावा पूर्ण करून कुडाळकर इलेवन वरती दणदणीत विजय मिळवला.
या संपूर्ण संघास अम्पायरसाठी विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे श्री.शिवाजी कामते कोल्हापूर जिल्हा अम्पायर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष , आणि श्री.सुनिल पाटील जिल्हा पंच सेक्रेटरी.
हा रोमहर्षक सामणा पाहण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील माजी.आमदार डाँ.सुजित मिणचेकर व सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व अप्परजिल्हा पोलिसप्रमुख जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.
उपस्थित होते.




