• Home
  • अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201211-WA0159.jpg

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

विशेष प्रतिनधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.११ – राज्यातील माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर झाली असून, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे गावच्या पुढाऱ्यांनीही आता कंबर कसली असून उमेदवारांची शोधा शोध सुरू केली आहे.

राज्यात माहे एप्रिल 2020 ते मार्च 2020 पर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणुका पार पडणार होत्या मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून, त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असल्याने या निवडणुका जानेवारी 2020 मध्ये घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दि.11 डिसेंबर रोजी एक पत्रक काढून दिल्या आहेत. ज्यात 15 डिसेंबर रोजी तहसीलदार यांनी निवडणूक नोटीस प्रसिध्द करणे, दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे, 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन छाननी करणे, दिनांक 4 जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे व निवडणूक चिन्ह नेमून देणे, दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान, दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मत मोजणी व दिनांक 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असा एकूण ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम राहणार आहे. त्यामुळे आता राजकीय रंगत गावच्या राजकारणात यापुढे दिसून येणार आहे.

anews Banner

Leave A Comment