Home कोल्हापूर आशा वर्कर्सांच्या सेवा समाप्तीचे आदेश मागे , ग्रामाविकासमंत्री मुश्रीफ

आशा वर्कर्सांच्या सेवा समाप्तीचे आदेश मागे , ग्रामाविकासमंत्री मुश्रीफ

178

राजेंद्र पाटील राऊत

आशा वर्कर्सांच्या सेवा समाप्तीचे आदेश मागे , ग्रामाविकासमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सर्वेक्षणांच्या थकीत मानधनासाठी आंदोलन करणार्‍या आशा व गटप्रवर्तकांना सेवासमाप्तीचे काढलेले आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागे घेण्याचे आदेश दिल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी आदेश मागे घेतले. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या आंदोलनाचा हा विजय असल्याचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी आशा कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदस्तरावरील मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे सांगितले. तसेच दुपारी पदाधिकार्‍यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याच्या केलेल्या विनंतीस मान देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क ,
कोल्हापूर

Previous articleनवीन कृषि कायद्याचा शेतकऱ्यांना कसलाही लाभ नाही , पालकमंत्री सतेज पाटील
Next articleकाँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांची आवाडे पिता पुत्रांची घेतली भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.