• Home
  • काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांची आवाडे पिता पुत्रांची घेतली भेट

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांची आवाडे पिता पुत्रांची घेतली भेट

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201208-WA0010.jpg

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांची आवाडे पिता पुत्रांची घेतली भेट

कोल्हापूर : काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांनी सोमवारी येथे माजी.खासदार कल्लाप्पा आवाडे व आमदार. प्रकाश आवाडे यांची निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. आ. आवाडे यांची काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून आवाडे कुटुंबीयांशी दोन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध असल्यामुळे सदिच्छा भेट असल्याचे एच.के.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले.
उद्याच्या होणार्‍या ‘भारत बंद’ आंदोलनात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शेतकरी आंदोलनाला बळकट देणार असल्याचे प्रभारी, पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
एका लग्न समारंभानिमित्त एच.के.पाटील, मंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, मा.आ. पी.एन.पाटील, आमदार राजू बाबा आवळे, आमदार. जयंत आसगावकर, खासदार . धैर्यशील माने, गणपतराव पाटील आदींसह मातब्बर नेतेमंडळींनी आज माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जि.प.सदस्य राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, जिल्हासंघटक आर.के.देवणे काँग्रेसचे जिल्हासचिव रघुनाथ पिसे , जिल्हा प्रवक्ता रणजीत पाटील , प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, प्रकाश मोरे, महेंद्र बागी इत्यादी होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क
कोल्हापूर

anews Banner

Leave A Comment