Home विदर्भ महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

206

राजेंद्र पाटील राऊत

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले.
मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे आगमन झाले. येथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण व अभिवादन केले.
नवनिर्वाचीत आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त बी.राधाकृष्णन ,पोलीस उपायुक्त नरूल हसन यावेळी उपस्थित होते. यांनतर सामूहिकरित्या बौध्द वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत सुरई ससाई,सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर सुटे,आनंद फुलझेले, आंबेडकर महाविदयालयाच्या प्राचार्या श्रीमती बी.एन.मेहरे व विद्यार्थी उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथून निघून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांचे समवेत विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleअखेर कुंटुर पोलिसांनी केले शासनाच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी निलंबित ग्रामसेकास जेरबंद
Next articleजागतिक मृदा दिनानिमित्त मुखेडात शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.