Home Breaking News *प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्ड्यात नेऊन तिच्यावर ॲसिड टाकून पेट्रोल ओतून पेटवून...

*प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्ड्यात नेऊन तिच्यावर ॲसिड टाकून पेट्रोल ओतून पेटवून आरोपी तिथून पसार झाला.*

209

*प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्ड्यात नेऊन तिच्यावर ॲसिड टाकून पेट्रोल ओतून पेटवून आरोपी तिथून पसार झाला.* देगलूर,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- देगलूर तालुक्यातील शेळगाव तालुका देगलुर जिल्हा नांदेड येथील अविनाश राजुरे असे ,या हल्लेखोरांचे नाव असून यांचे गावातीलच एका 22 वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध जुळले होते. हे दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळीनिमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीवरून पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील यलबघाट जवळ अविनाशने दुचाकी एका रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रियसीला रस्त्यापासून दूर एका खड्ड्यात नेऊन तिच्यावर ॲसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून देऊन तिथून पसार झाला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केली .मात्र पहाटेची वेळ असल्यामुळे कुणीही मदतीला आले नाही. मोठ्या प्रमाणात भाजलेली ही तरुणी तब्बल बारा तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकास तिचा आवाज ऐकू आला .व त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरूणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .आरोपी पकडला गेला असून असे अजून किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे. या मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असे व्यक्त केले आहे.👉( व्हिडीओ बातमी बघा सकाळी युवा मराठा न्युज चँनलवर)

Previous article*जाहूर ते खानापूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा*
Next articleबहिरेवाडीतील शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.