Home Breaking News बहिरेवाडीतील शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार

बहिरेवाडीतील शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार

154

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी ता.आजरा येथील जवान ऋषिकेश जोंधळे शुक्रवार दि.१३ रोजी दुपारी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झाले. त्यांचे पार्थिव रविवार दुपारपर्यंत बहिरेवाडीत येणार होते. पण जम्मू-काश्मीरमध्ये पडत असणाऱ्या बर्फवृष्टीमुळे व पार्थिव उशिरा ताब्यात मिळाल्याने ते उद्या सोमवार दि. १६ रोजी सकाळी ७ वाजता बहिरेवाडी येथे येणार आहे.
सकाळी ७ ते ७.३० कुटुंबीयासाठी दर्शनासाठी, त्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. मान्यवराचे शोकसंदेशपर भाषण, ध्वजप्रदान कार्यक्रम, मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बहिरेवाडी येथील शाळेच्या पटांगणामध्ये शहीद जोंधळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी चबुतरा बांधण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंग राखून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्थिव ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सी.आर. एफ (सायरन रिस्की फोर्स ) कमांडो, व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक गावातील विविध मंडळाचे कार्यकर्ते, पोलिस अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे नियोजन करणार आहेत. सकाळी ७ ते १० दरम्यान हडलगे फाटा, चोथ्याची खोप, मुमेवाडी तिट्टा येथील वाहतूक मार्ग बदलण्यात येणार आहे. दरम्यान आज आमदार चंद्रकांत जाधव व खासदार धैर्यशील माने यांनी जोंधळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous article*प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्ड्यात नेऊन तिच्यावर ॲसिड टाकून पेट्रोल ओतून पेटवून आरोपी तिथून पसार झाला.*
Next articleकोल्हापूरात तोफेच्या दारूचा स्फोट युवकाचा हात निकामी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.