• Home
  • कोल्हापूरात तोफेच्या दारूचा स्फोट युवकाचा हात निकामी

कोल्हापूरात तोफेच्या दारूचा स्फोट युवकाचा हात निकामी

कोल्हापूर : दिपावली लक्ष्मीपूजनानंतर कोल्हापूर शहरात फटाक्यांची आतषबाजी झाली.
मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात तर चक्क लक्ष्मीपूजनानंतर एका घराण्यात दरवर्षी तोफ उडविली जाते. या घराण्याच्या वतीने पूर्वी शहरातून श्री तुळजाभवानी देवीची सबिना मिरवणूक काढली जात असे; पण काळाच्या ओघात मिरवणूक बंद झाली. त्यातील धातूची तोफ आजही या घराण्याकडे आहे.
शनिवारी श्री लक्ष्मीपूजनानंतर रात्री दहाच्या सुमारास तोफ उडविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भागातील तरुण जमले. त्याच वेळी तोफेचा पहिला बार उडविला. तोफ गरम असतानाच त्यात दुसऱ्यांदा शोभेची दारू ठासून भरत असतानाच अचानक या दारूचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज होऊन धूर पसरला. स्फोटामुळे तोफेत दारू ठेचणाऱ्या युवकाच्या हाताचा पंजा फाटून हातच निकामा झाला; तर बालाजी पार्क परिसरातील युवकाच्या डोळ्यात स्फोटाची दारू उडाल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तोफेचा गोळा तिसऱ्या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने तो मोठ्या दुर्घटनेतून बचावला.

दरम्यान, रात्रीच जखमी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली; पण त्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली; कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस प्राथमिक चौकशी करून निघून गेले.

कोल्हापूर ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment