*निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी* निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२० रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, शिक्षण व सहकार महर्षि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते निमगाव गावातील भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने “कर्मवीरांच्या पाऊलवाटा” या विषयावर वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी मुख्य वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस.एल.अहिरे होते. यावेळी बोलतांना प्रा. अहिरे यांनी शेती, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या योगदानाची माहिती श्रोत्यांना करून दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.कल्याण कोकणी व महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सामाजिक सुरक्षा नियम पाळण्यात आले होते.