Home Breaking News ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे

ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे

102
0

ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे (मनोज बिरादार युवा मराठा न्युज)-मुंबई. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. अखेरीस त्याच्या संदर्भात निर्णय घेतला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदती बद्दलची माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन दिले होते ते सरकार पूर्ण करत आहे निवडणूक आयोगाला मदत वाटपाबाबत पत्र देण्यात आले आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल असे वडेट्टीवार यांनी सांगितले.राज्यात परतीच्या पावसाने अनेक भागात झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करून केली. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचे सांगत धीर दिला होता.

Previous article*प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे इनामला आश्वासन*
Next articleमौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here