Home Breaking News महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

238

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज 

मुंबई,दि.५ – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग पदवीधर या तीन मतदार संघांसाठी तसेच अमरावती विभाग आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीचे वृत्तसंकलन व छायाचित्रण करण्यासाठी मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राधिकारपत्रे देण्यात येणार असून त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने केले आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

प्राधिकारपत्रांसाठी इच्छुक वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे दि. 17 नोव्हेंबर, 2020 पर्यंत तपशील व संपादकांच्या शिफारशींसह अर्ज पाठवावा. अर्जासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे जोडावीत. एकाच व्यक्तीला मतदान तसेच मतमोजणी अशा दोन्ही केंद्रामध्ये प्रवेश हवा असल्यास, अशा व्यक्तींची तीन छायाचित्रे देणे आवश्यक राहील. छायाचित्रांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. विहित दिनांक व वेळेपूर्वीच आपले अर्ज द्यावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे सादर करावेत.

Previous articleराज्य सरकारने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी ; सार्वजनिक बांधकाममंत्री मा अशोक चव्हाण
Next articleअखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश एन भांगे यांनी नियुक्ती 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.