Home Breaking News *केली कुणीतरी करणी* *म्हणून लिहिली लेखणी,*

*केली कुणीतरी करणी* *म्हणून लिहिली लेखणी,*

149
0

*केली कुणीतरी करणी*
*म्हणून लिहिली लेखणी,*
*डाँ.अभयसिंह यादव*

*कोल्हापूर प्रतिनिधी (युवा मराठा न्युज)*

*उठा उठा आमोस्या आली काळी* *करणी करायची वेळ झाली,*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात करणी भर चौकात वर्दळीच्या ठिकाणीच पहायला मिळाली,
काल आमावस्या आणि वडगांवात झाली करणी,
हे काय वडगांव शहराला नवीन नाही
वडगांव शहरात पोर्णिमा असो वा आमावश्या कुठं ना कुठं तरी लिंबू उतारा काहीतरी आढळुन येणारचं
म्हैस दुध देतनाही , बैल चारा खात नाही , घरात काहीतरी घडले कि जावा देवरशी कडे जायचं तो सांगेल तो उतारा तिकाटन्यावर पडलाच म्हणून समजा.
अजूनही वडगांव शहरात अंधश्रद्धा जपली जाते ,
पोर्णिमेला तर हमखास मराठा नगर च्या कमानी जवळ , आणि डाँ.चौगलै नगर च्या कमानी जवळ लिंबू , नारळ , दोन माणसं जेवतील एवढा भात ,भाकरी हळद कुंकू हे ठरलेला उतारा पहायला मिळणारचं,
पण कालच्या आमवश्याला तर कहरच झाला करणी हळूहळू आता
तिकाटण्यावरणं मुख्य शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे
श्री विजयसिंह यादवसाहेब चौकात आली आहे ,
त्यात लिंबू नारळ गुलाल बाहुल्या आणि लै काही, त्यात पेपर पण हाय,
त्या पेपरात कुणाचे फोटो हाईत का
अस एकास विचारलं त्यो म्हणाला मी काय पुढं जाणार नाही बाबा..!!
काळ्या करणीन काही हो किंवा ना हो पण दहशत मात्र शहरात आहे हं…असो…!
काही काही जण आपल्याच फोटोची करणी कर्त्यात म्हणे म्हणजे आपली तेवढीच चर्चा ओ,
काही काही दुसऱ्याची- म्हणजे त्याला टेन्शन ओ, काही लोक नुसतं करून गम्मत बघत्यात,
काही लोक कोकणातुन सेरिअसली विषय आणत्यात म्हणे..!
असं करणीच वेगवेगळ प्रकार,
पण
करणी हि नेहमी राजकरणी
झाली पाहिजे गुन्हा नोंदणी
करणी पेक्षा
भरणी महत्वाची खड्ड्याची ओ…

*उठा उठा आमोस्या आली काळी करणी करायची वेळ झाली*

Previous article*माझे कुटुंब माझी जबाबदारी* *जिल्ह्यात दुसऱ्या फेरीच सर्व्हेक्षण* *पूर्ण*
Next article*#शेतकरी_मायबापाना_घेवुन_शेतकरी_पुञानी_गाठले_इफको_टोकीयो_विमा_कंपनीचे_अधिकारी_ओला_दुष्काळ*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here