Home Breaking News कळवणला प्रकल्पअधिका-यांना आदिवासी शिक्षक कर्मचारी संघटनेचे निवेदन

कळवणला प्रकल्पअधिका-यांना आदिवासी शिक्षक कर्मचारी संघटनेचे निवेदन

167
0

कळवणला प्रकल्पअधिका-यांना आदिवासी शिक्षक कर्मचारी संघटनेचे निवेदन कसमादेपेसुदि( नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- काल मंगळवार दिनांक ६/1१०/२०२० रोजी सीटू संलग्न आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना माध्यमातून कोरोना महामारीत कराव्या लागणाऱ्या सर्व्हे कामासाठी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या आणि कर्मचारी बांधवांना 50 लाखाचे विमा कवच, याबाबत प्रकल्प अधिकारी सो कळवण यांना निवेदन देण्यात आले. प्रकल्प अधिकारी महोदय मिटिंगसाठी नाशिक येथे गेले कारणाने मा. वडजे सो सहा. प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी भावना व्यक्त केल्या. आपल्या भावना कार्यालयाने ऐकल्या आणि सदर मागणी रास्त असून स्वतः मा. प्रकल्प अधिकारी महोदय यांना संघटनेचे निवेदन देऊन झालेल्या चर्चेबाबत यथाशक्ती अवगत करून देणेबाबत मा. वडजे साहेबांनी सांगितले.
सदर कामाला आमचे कर्मचारी विरोध करत नाहीत पण ही वेळ पूर्ण पणे अयोग्य असल्याचे त्यांनी मान्य केले….

आज या प्रसंगी निवेदन देताना श्री.बी.के. गांगुर्डे, श्री. काकुळते सर, श्री. एन.जी.देवरे, श्री. एस.पी.देवरे, श्री. एस.पी. थोरात, श्री. ए.बी. सूर्यवंशी, श्री. जे.के. सोनवणे, श्री. वाय.ई. बागुल, श्री बालाजी सूर्यवंशी, श्री. जयकिशोर राऊत, श्री. अतुल आहेर, श्री. एस.बी. बिरादार उपस्थित होते.
महाराष्ट्र भर सीटू संघटनेच्या वतीने हा प्रशासनाला जागे करण्याचा एकहाती कार्यक्रम घेऊन यशस्वी केला याची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल.असेही यावेळी नमुद करण्यात आले.

Previous articleमनीषा वाल्मीकीच्या हत्या कांडा तील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
Next article🛑 उदयनराजे भोसले यांची मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ, मोठा निर्णय घेणार? 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here