आशाताई बच्छाव
साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ –नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
येथील माळमाथा, परिसरातील टिटाणे, खोरी, छडवेल कोरडे पश्चिम पट्टयात बागायत शेत्र कमी कमी प्रमाणातआहे म्हणून येथील शेतकऱ्यांचा प्रमुख खरीप हंगामही वाया गेला. शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आलेले आहे संपुर्ण साक्री तालुक्यातील शेतकरी बांधवाचा तोंडी आलेला घास देखील निसर्गाच्या अवकाळी पावसात झालेल्या असमानी संकटाने मोठे अतोनात नुकसान केले आहे, परंतु ती स्थानिक परिस्थिती कोणालाही कधीच का दिसत नाही? असा देखील प्रश्न जनतेच्या नजरेने कैद झाला आहे.
निसर्गाने दिलेला फटका सपुर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला आहे, तिथे मात्र पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू झालेले
असुन, साक्री तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे मात्र अद्याप कोणतीही प्रक्रिया बांधावर आलेली नाही आहे, तरी शासनाचे हात बांधलेल्या अवस्थेत का आहेत, कर्जाच्या पैशानी आणलेली महागडी बियाणे टाकली खरी पण मात्र ती कवडीमोल मातीतच संपली, मका काढणीस आला खरापण पाण्यातच तरंगताना शेतकरी हवालदिलच परत झाला, काद्यांनी तर चक्क भावाच्या घसरणीवर ठार केले, मग तर कर्जाचा डोंगर जसातसा परत का शेतकरी बाधवान समोर उभा राहीला, शासनाने पाहणी करून शेतकरी बांधवाच्या शेती पिकाचे झालेल्यानुकसानीचेतात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा.






