Home अमरावती जि. प. निवडणूक खर्च १४ लाख, प. स. ६ लाख: उमेदवारांना दिलासा,...

जि. प. निवडणूक खर्च १४ लाख, प. स. ६ लाख: उमेदवारांना दिलासा, आयोगाने मर्यादा वाढवली.

202

आशाताई बच्छाव

1002164190.jpg

जि. प. निवडणूक खर्च १४ लाख, प. स. ६ लाख: उमेदवारांना दिलासा, आयोगाने मर्यादा वाढवली. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांना८ लाखा ऐवजी १४ लाख रुपये तर पंचायत समिती उमेदवारांना ३ लाख ऐवजी ६ लाख रुपये खर्च करता येणार आहे यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मर्यादा अनेक वर्षापासून लागू होती वाढत्या महागाईमुळे उमेदवारांना जुन्या मर्यादित खर्च करणे कठीण होत होते त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती शासनाच्या विचारधणे असलेल्या या मागणीला अखेर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिली दाखवला आहे. केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नव्हे तर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायतच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे आता महानगरपालिका उमेदवारांना ८ लाख एवजी१४ लाख रुपये खर्च करता येतील. नगरपालिकेसाठी ही मर्यादा ७ लाखावरून १२ लाख ( अ वर्ग नगरपालिकेसाठी १४ लाख ) करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या उमेदवारांना ४ ऐवजी८ लाख रुपये खर्च करता येणार आहेत. ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी नवीन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ११ सदस्या पर्यंत ग्रामपंचायत साठी २ लाख रुपये, ११ते१५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत साठी ४ लाख रुपये तर १६ किंवा त्याहून अधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत साठी ६ लाख रुपये खर्च करता येणार आहे. पूर्वीची मर्यादा या रकमेच्या निम्मी होती निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous articleसुसाट समृद्धीवर १५०0 सीसीटीव्ही कॅमेरे, नागपूर ते मुंबई पर्यंत राहणार वॉच. चोरट्यांनो सावधान सुसाट वाहनचालकार होणार कारवाई
Next articleसाक्री तालुक्यात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.