Home बुलढाणा पंचाळा येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचा उत्साहात समारोप

पंचाळा येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचा उत्साहात समारोप

211

आशाताई बच्छाव

1002153634.jpg

पंचाळा येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचा उत्साहात समारोप
✍🏻 स्वप्निल देशमुख

संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराजांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सात दिवसीय हरिभक्तीमय सोहळा सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्साहात संपन्न झाला.

सप्ताह दरम्यान दररोज काकड आरती, गाथा पारायण, हरिपाठ, भजन, संगीत कीर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठ सेवा हरिभक्त पारायण निलेश महाराज झांबरे (सखारामपूर) यांनी बजावली. तसेच गायनाचार्य परशुराम महाराज सपकाळ, गजानन महाराज सपकाळ, मृदुंगाचार्य परमेश्वर महाराज आळंदीकर यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी भक्तिमय सेवा सादर केली.

सप्ताहात हरिभक्त पारायण गजानन महाराज गोंडचवर, रामभाऊ महाराज उन्हाळे, संतोष महाराज सखारामपुरकर, संतोष महाराज टिकार आळंदीकर, महादेव महाराज सखारामपुरकर, ज्ञानेश्वर महाराज वाघ (वारी भैरवगड), प्रशांत महाराज ताकोते आणि निलेश महाराज झांबरे यांच्या कीर्तनसेवा रंगल्या.

समारोपाच्या दिवशी निलेश महाराज झांबरे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. टाळ-मृदुंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज गाथा ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंचाळा गावातील महिलांनी रंगीत रांगोळ्यांनी गाव सजविले होते व प्रत्येक घरात गाथा ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

सप्ताह सोहळ्यास धामणगाव, पळशी, झाशी, उमरा, टुनकी, बावनबीर आदी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टाळकरी विलास पाटील, अंबादास पाटील, शंकर खानझोड, नंदकिशोर चोपडे, ज्ञानेश्वर खानझोड, मुरलीधर पाटील, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील तसेच समस्त गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने उपस्थित होती.

या भक्तिमय सप्ताह सोहळ्याचे यशस्वी आयोजन सर्व पंचाळा ग्रामस्थ व हरिभक्तांच्या सहभागातून पार पडले. ही माहिती नंदू पाटील खानझोड यांनी दिली.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराचा तीन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष जलसंपदा विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट दाराने काम दरम्यान पुन्हा जलवाहिनी फोडली.
Next articleकार्तिक मास एकादशी .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.