Home गडचिरोली गडचिरोली बसस्थानकात अनोखी घटना — ड्रायव्हरशिवाय बस मागे सरकली, प्रवाशांमध्ये धावपळ

गडचिरोली बसस्थानकात अनोखी घटना — ड्रायव्हरशिवाय बस मागे सरकली, प्रवाशांमध्ये धावपळ

625

आशाताई बच्छाव

1002147973.jpg

गडचिरोली बसस्थानकात अनोखी घटना — ड्रायव्हरशिवाय बस मागे सरकली, प्रवाशांमध्ये धावपळ

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ दि. २ नोव्हेंबर :
गडचिरोली एस.टी. बसस्थानकात आज सकाळी एक अनोखी घटना घडली. सकाळी सुमारे १०.३० वाजता थांबलेली प्रवासी बस अचानक बिना चालक मागे सरकू लागल्याने काही क्षणांसाठी बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस मागे सरकताना प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत धावपळ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी चालक बस सुरू ठेवून काही कामानिमित्त चौकीकडे गेला होता. दरम्यान, अचानक बस रिव्हर्स जायला लागल्याचे लक्षात येताच एका सतर्क प्रवाशाने तात्काळ धाव घेत बसमध्ये प्रवेश करून ब्रेक दाबून बस थांबवली.

या प्रकारामुळे काही काळ प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा पुढील तपास सुरू असून, या बाबत योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.