Home गडचिरोली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करा...

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

138

आशाताई बच्छाव

1002147932.jpg

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

3 ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली किंवा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मार्फत स्वीकारण्यात येतील अर्ज

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ :: स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून नगर अध्यक्ष करीता खुला प्रवर्ग 5000/ रु., SC, ST व महिलांकरीता 2500/- रु, नगरपरिषद सदस्य खुला प्रवर्ग 2000/- SC, ST व महिलांकरीता 1000/- रु, जिल्हा परिषद सदस्य खुला प्रवर्ग 2500/-रु, SC, ST, व महिलांकरीता 1250/-, पंचायत समिती सदस्य खुला प्रवर्ग 1500/-, SC, ST, व महिलांकरीता 750/- रु प्रमाणे इच्छुकांनी शुल्क भरून दिनांक 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली, आमदार रामदास मसाराम जनसंपर्क कार्यालय वडसा किंवा सर्व तालुकाध्यक्ष , मार्फत जमा करता येणार आहे.
त्या नंत्तर प्राप्त अर्जापैकी  6 नोव्हेंबर 2025 रोजी, जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते नगरपरिषद (गडचिरोली /आरमोरी /वडसा ) करीता प्राप्त इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा निवड मंडळ मार्फत मुलाखती घेण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामार्फत निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Previous articleलोकशाहीला ग्रहण पिवळ्या पित्त पत्रकारितेचा गोरखधंदा
Next articleगडचिरोली बसस्थानकात अनोखी घटना — ड्रायव्हरशिवाय बस मागे सरकली, प्रवाशांमध्ये धावपळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.