Home उतर महाराष्ट्र विरदेल येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोस्ट ऑफिस(डाकघर) ची जागा लवकरात लवकर चांगल्या...

विरदेल येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोस्ट ऑफिस(डाकघर) ची जागा लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी..

220

आशाताई बच्छाव

1002147985.jpg

विरदेल येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोस्ट ऑफिस(डाकघर) ची जागा लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी..

(डॉ.पवन राजेंद्र बेहेरे यांचे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन…)

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये एका छोट्याशा शॉप मध्ये पोस्ट ऑफिस हे चालू करण्यात आले आहे…भारतातले महत्त्वाचे मानले जाणारे पोस्ट ऑफिस हे सामान्य लोकांची बँक ही मानली जाते…
विरदेल पोस्ट ऑफिस ची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे की पोस्टमन व त्यांचे कर्मचाऱ्यांना बसायची सुद्धा व्यवस्था नाही व त्याचबरोबर आता सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर गावातील व परिसरातील लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी जात असतात अशाच परिस्थितीत त्यांना बसायला सुद्धा व्यवस्था नाही.. त्या ठिकाणी ज्या महिलांनी सांगितले की उभे राहण्यासाठी अजिबात चांगली जागा नाही.. आफीस मध्ये ..ना पिण्याच्या पाण्याची सोय नाही.. ना फॅनची सोय नाही.. त्याच बरोबर विरदेल गावाची बंद पडलेली भाजीपाला मार्केट चा संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य मोठ्या माणावर प्रत्यक्ष दिसून आलेले आहे..त्या ठिकाणी ते पोस्ट ऑफिस आहे अशा ठिकाणी असलेल्या बिकट परिस्थितीला त्याकडे प्रशासनाचे व विरदेल ग्रामपंचायती चे अजिबात लक्ष नाही असे दिसून येते..
त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी यांनी सांगितले की आम्ही बऱ्याचदा सांगून सुद्धा आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही, आम्ही शेवट कर्मचारी आम्हाला ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो..
पोस्ट ऑफिसमध्ये कागदपत्र ठेवण्याच्या कपाटीला साधा दरवाजा सुद्धा नाही. व त्याचबरोबर ऑफिसमध्ये वाळूचे ढिगारे दिसून आलेले,,खूप मोठ्या प्रमाणावरती घाण झालेली निदर्शनात आले..अत्यंत भयानक अशी परिस्थिती आपल्या विरदेल गावाच्या पोस्ट ऑफिस मध्ये आहे म्हणून लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन चांगल्या ठिकाणी पोस्ट ऑफिस ला चौकात जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणी साठी शिंदखेडा तहसील कार्यालय येथे जाऊन माननीय तहसीलदार श्री.नितीनकुमार देवरे (साहेब) यांची भेट घेवून विरदेल ग्रामपंचायत परिसरात असलेले पोस्ट ऑफिस ( डाक घर ) साठी समाधानकारक जागा उपलब्ध करून देण्याबाबत किंवा नुतनीकरण करण्याबाबत विनंती पूर्वक निवेदन देण्यात आले व विरदेल गावाच्या विविध विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली. त्यावेळी विरदेल येथील युवानेते डॉ.पवन राजेंद्र बेहेरे व मित्र परिवार गावातील नागरिक हे उपस्थित होते.

Previous articleगडचिरोली बसस्थानकात अनोखी घटना — ड्रायव्हरशिवाय बस मागे सरकली, प्रवाशांमध्ये धावपळ
Next articleविरदेल गावासाठी माझं गाव –सुंदर गाव संकल्पनेतून घनकचरा गाडी मंजूर..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.