आशाताई बच्छाव
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नगरमध्ये हल्ला अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. अहिल्यानगर जवळ असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी वाहनावर हल्ला केला.
आज (ता. २७) पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी दोन वाजता त्यांची ही सभा होणार आहे. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.आज लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे. पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हे हल्ला करणारे कोण होते? त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.