Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे परिसरात केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान…

शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे परिसरात केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान…

131

आशाताई बच्छाव

1002013675.jpg

शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे परिसरात केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान…

(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील लोहगाव-वसमाणे परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे केळी व पपईसह ऊस, कापूस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी काल (दि.२८) सकाळी ११ वाजता स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी तत्काळ मदत
शेतकरी हतबल; शानाभाऊ सोनवणे यांची तात्काळ मदतीची मागणी
शासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.आईच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवत शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ पंचनामे करण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ज्या पद्धतीने लोहगाव-वसमाणे येथे पंचनामे करण्यात आले आहेत, त्याच
पद्धतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांत सहानुभूती अनुदान मिळाले पाहिजे, असे सांगितले. पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान पाहून शेतकऱ्यांमध्ये हतबलता असून शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. यावेळी लोहगाव-वसमाणेचे माजी सरपंच महेंद्र पाटील, धमाणे येथील दादाभाऊ पाटील, शेतकरी जगदीश पाटील, सतीश माळी, जगन्नाथ माळी, सुनील पाटील, मुरलीधर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, ईश्वर माळी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Previous articleअतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात
Next articleपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कडून पाहणी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.