Home उतर महाराष्ट्र पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कडून पाहणी….

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कडून पाहणी….

106

आशाताई बच्छाव

1002013695.jpg

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कडून पाहणी….

(राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ; तत्काळ पंचनाम्याचे मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश)…..

(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केली. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून यंत्रणेने तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्री श्री. रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने व तापी परिसरातील गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तहसीलदार संभाजी पाटील, कृषी अधिकारी देवेंद्र नागरे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी सभापती जिजाबराव सोनवणे यांच्यासह महसूल. आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.