Home भंडारा अड्याळ येथे पोलीस व डॉक्टर बंधूंना सुरक्षाबंध

अड्याळ येथे पोलीस व डॉक्टर बंधूंना सुरक्षाबंध

229

आशाताई बच्छाव

1001809830.jpg

अड्याळ येथे पोलीस व डॉक्टर बंधूंना सुरक्षाबंध

संजीव भांबोरे
भंडारा -पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन मध्ये समाज जागृती प्रतिष्ठान द्वारा संचालित स्व. हरिदासजी बदियानी स्मृती अभ्यासिका तर्फे सुरक्षाबंध ( रक्षाबंधन ) कार्यक्रम ०९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता संपन्न झाला. पोलीस विभाग तथा वैद्यकीय विभागातील कर्मचारी हे सामाजिक बांधिलकी म्हणून अहोरात्र देशकार्यासाठी व समाजसेवेत झटणाऱ्यांना सुरक्षासुत्र कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामीण रुग्णालय अड्याळ व पोलीस स्टेशन अड्याळ येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी देशांतर्गत कायदा, सुरक्षा व सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समाजात शांतता व सुरक्षितताअनुभवता येते.
सतत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन करुन आपले नागरी कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आपण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत , असे समितीच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

Previous articleशारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश
Next article…….. लेख……… नवीन पिढीला लग्नाची भीती का वाटते? –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.