Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा येथून पुण्यासाठी रेल्वे सुरू करा…..  (खासदार शोभा बच्छाव यांना दिपक देसले...

शिंदखेडा येथून पुण्यासाठी रेल्वे सुरू करा…..  (खासदार शोभा बच्छाव यांना दिपक देसले यांनी दिले निवेदन)

101

आशाताई बच्छाव

1001759055.jpg

शिंदखेडा येथून पुण्यासाठी रेल्वे सुरू करा…..

(खासदार शोभा बच्छाव यांना दिपक देसले यांनी दिले निवेदन)

 

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा येथून पुणे येथे रेल्वेने जाण्यासाठी नवीन उधना पुणे रेल्वे सुरू करावी, तसेच येथील रेल्वे स्टेशनवर विविध सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी शिंदखेडा नगरपंचायतचे माजी प्रभारी नगराध्यक्ष दिपक देसले यांनी धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातून शैक्षणिक व औद्योगिक कामानिमित्त पुणे शहरात जाण्यासाठी व येण्यासाठी एकही रेल्वे गाडी उपलब्ध नाही. यामुळे शिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा, बेटावद, चिमठाणे येथील नागरिकांना व्यापार व इतर शैक्षणिक कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन खासगी वाहनांनी जावे लागत आहे. त्यामुळे पुणे येथे जाण्या-येण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात बऱ्याच वर्षांपासून शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांची मागणी आहे. मात्र, आतापर्यंत या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदखेडा येथे जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. तसेच उधना, शिंदखेडा, पुणे ही नवीन गाडी व वरील गाड्यांना थांबा मिळण्याबाबत आपण उचित कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी शिंदखेडा येथे थांबा

मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन धुळे लोकसभा खासदार शोभा बच्छाव यांनी शिंदखेडा नगरपंचायत माजी प्र. नगराध्यक्ष दिपक देसले सह शिष्टमंडळाला दिले.

Previous articleकळवण तालुक्यातील ग्रामीण भागात होणार कॅन्सर रुग्णांचे मोफत निदान आणि उपचार         
Next articleमालेगावात महिला कर्मचाऱ्यांचा छळ झाल्याच्या तक्रारी,नंतर सारेच आलबेल!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.