Home उतर महाराष्ट्र शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या

148

आशाताई बच्छाव

1001758746.jpg

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या                                  अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (ता. २८) सकाळी उघडकीस आली आहे.
नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण गाजत आहे. तसेच मुस्लिम नागरिकांना देवस्थानमध्ये नोकरी दिल्याची घटना तसेच त्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केल्याचा प्रकार घडला होता. आता शेटे यांच्या आत्महत्ये नंतर शनैश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आले आहे. शेटे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.