Home अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम : अमरावती जि. प. मतदार संघावरील आक्षेपांची सुनावणी...

जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम : अमरावती जि. प. मतदार संघावरील आक्षेपांची सुनावणी १ ऑगस्टला विभागीय आयुक्ता समोर

190

आशाताई बच्छाव

1001758807.jpg

जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम : अमरावती जि. प. मतदार संघावरील आक्षेपांची सुनावणी १ ऑगस्टला विभागीय आयुक्ता समोर. दैनिक युवा मराठा पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्हा परिषद च्या मतदार संघाच्या प्रारूप रचनेवरील आक्षेपांची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या दलांना सकाळी ११ वाजता ही सुनावणी सुरू होईल. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाचे प्रारूप आयुक्ताकडे सुपर्द केले आहे. यापूर्वी त्यांनी प्राप्त झालेल्या आक्षेप व सूचनांचा विचार केला आहे. नव्या रचनेत चांदुर रेल्वे तालुक्यातील एक मतदारसंघ कमी झाला आहे अचलपूर तालुक्यात एक मतदारसंघ वाढला आहे मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील एक एका मतदारसंघाचा अपवाद वगळता एका सर्व मतदारसंघाची नावे बदलण्यात आली आहे काही ठिकाणी जवळची गावे सोडून दूरची गावे एखाद्या मतदारसंघात समाविष्ट करण्यात आल्याचे तक्रारी प्राप्त झाले आहे जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या अशा १८ तक्रारीची सुनावणी विभागीय आयुक्त घेणार आहेत विभागीय आयुक्त या नात्याने त्यांना अमरावती जिल्ह्यातील पाच जिल्ह्यातील तक्रारीची सुनावणी करायची आहे यासाठी वेळ पत्रक तयार केले असून अमरावतीसाठी १ ऑगस्ट हा दिवस निश्चित केला आहे सुनावणीनंतर मतदार संघाच्या रचनेत किंवा नावात आयुक्त आवश्यकते बदल करतील त्यानंतर ११ ऑगस्टला ही रचना जिल्हाधिकारी कडे पाठविले जाईल १८ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाचे अंतिम रचना घोषित केली जाईल मतदार संघाची अंतिम रचना घोषित झाल्यानंतर आरक्षण निश्चित केले जाणार आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली जाईल गेल्या५ वर्षातील आरक्षणाची स्थिती आधार मानून निवडणूक आयोगाच्या चक्राकार सूत्रानुसार आरक्षण ठरविले जाईल आरक्षण मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी मतदार संघ राखीव ठेवला जातील. त्यातील महिलासाठी मतदार संघ ही निश्चित केले जातील अनारक्षित मतदार संघामध्ये महिलासाठी काही जागा राखीव ठेवल्या जाते.