आशाताई बच्छाव
मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना चित्रकलेपासून वंचित ठेवले जात आहे विदर्भ कला शिक्षक संघ आणि खोज संस्था देणार लढा शंभराहुन अधिक शाळांमध्ये फक्त सहा कलाध्यापक. दैनिक युवा मराठा पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी. अमरावती. कलासक्त आदिवासी समाजाच्या मेळघाट भागात कलाध्यापकांचा मोठा अभाव आहे. प्रसिद्ध वारली पेंटिंग साठी ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाच्या मुलांना चित्रकलेच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे विदर्भ कला शिक्षक संघाने या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद इंगोले आणि खोज संस्थेचे एडवोकेट बंड्या साने यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की मेळघाटातील भुतांच्या विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतात या आश्रम शाळा आदिवासी कल्याण विभागामार्फत चालवल्या जातात परंतु या शाळेमध्ये कलाध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये कलाध्यापकांचा अनुशेष आहे कलाध्यापक नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थी चित्रकलेच्या एलिमेंट्री आणि इंटरनेट इडियट परीक्षा पासून दूर राहत आहे या परीक्षेचे अर्ज शाळा मार्फत भरले जातात परंतु विषय शिक्षक नसल्याने मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक या विषयात फासे लक्ष देत नाही मेळघाटच्या दोन्ही तालुक्यात शाळा आणि आश्रम शाळेची संख्या 100 गुण अधिक आहे तरी तेथे फक्त सहा कलाध्यापक आहेत चिखलदरा तालुक्यात चार आणि धार्मिक तालुक्यात दोन अशी त्यांची विभागणी आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या माहितीला दुसरा दिला आहे विदर्भ कला शिक्षक संघ आणि खोज संस्था लवकरच आश्रम शाळा चालविणाऱ्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आदिवासी आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांची भेट घेणार आहे. या बैठकीला मेळघाट मधील कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून हा विषय राज्याचे कला संचलनालय आणि शिक्षण मंत्री पर्यंत नेला जाईल या बैठकीत कार्यकर्ते सोनू भास्करे उषा बेलसरे,सुमित्र आहाके, सुनील बेसरे ., आणि सुनील बेलसरे हेही उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले की चित्रकलेसाठी कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली होती परंतु नंतर ते शिक्षक न्यायालयात गेल्याने सध्या अवशेष निर्माण झाला आहे






