Home बुलढाणा चंदनाची वाहतूक करणारी आयशर पोलिसांच्या जाळ्यात; मलकापूर पोलिसांची कार्यवाही !

चंदनाची वाहतूक करणारी आयशर पोलिसांच्या जाळ्यात; मलकापूर पोलिसांची कार्यवाही !

143

आशाताई बच्छाव

1001694819.jpg

चंदनाची वाहतूक करणारी आयशर पोलिसांच्या जाळ्यात; मलकापूर पोलिसांची कार्यवाही !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मलकापूर :-बुलडाणा आयशरद्वारे नेण्यात येणारे पंधरा लाख रुपये किमतीचे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. वाहनासह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपानजीक बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) कडे जाणारे मालवाहू आशयर आले. संशयावरून पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तपासणी केली असता आयशर गाडीमध्ये अतिरिक्त कप्पा बनवून त्यात सहा क्विंटल २९ किलो दीड फुटांचे चंदन
गाभे, दोन क्विंटल चंदन गाभा आणि चुरा असे आठ क्विंटल चंदन किंमत १५ लाख ३० हजार रुपये, आयशर सह २५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक शेख जैनुद्दीन शेख अजीम (४२) रा. नेकनूर ता.जि. बीड यास ताब्यात घेतले आहे. चंदनाचा माल असल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली होती.

Previous articleचिखलीतील ‘रोड रॉबरी’ प्रकरणात पोलिसांचा धमाकेदार खुलासा !
Next articleसमाजाचा मजबूत कणा म्हणजे प्रामाणिक पत्रकारीता: – नानासाहेब जावळे -पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.