Home बुलढाणा चिखलीतील ‘रोड रॉबरी’ प्रकरणात पोलिसांचा धमाकेदार खुलासा !

चिखलीतील ‘रोड रॉबरी’ प्रकरणात पोलिसांचा धमाकेदार खुलासा !

94

आशाताई बच्छाव

1001694784.jpg

चिखलीतील ‘रोड रॉबरी’ प्रकरणात पोलिसांचा धमाकेदार खुलासा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :– बुलडाणा चिखलीत भरदिवसा प्रवाशाला धमकावून खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांचा तीन तासांत शोध लावून पोलिसांच्या डी. बी. पथकाने चांगलीच चुणूक दाखवली. असताना शिवाजी शाळेजवळ अॅटोमधून आलेल्या दोघांनी त्याला गाठून गळा दाबत जीवे मारण्याची धमकी दिली आणि खिशातील ₹३००० रोख व ₹१८,५०० किमतीचे दोन मोबाईल हिसकावले. या धक्क्याने फिर्यादीची पत्नी तब्येत बिघडल्यामुळे तक्रार दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पो.नि. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत बुलडाण्यातून आरोपी शेख नुमान व फैजान खान यांना ताब्यात
दि. ४ जुलै रोजी राऊतवाडी येथील AU स्मॉल फायनान्स बँकेतून पत घेतलेले पैसे आणि दोन मोबाईल घेऊन फिर्यादी बसस्टँडकडे जात
घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ₹८०,००० किंमतीचा अॅटो, दोन्ही मोबाईल आणि ₹१७६० रोख रक्कम असा एकूण ₹१,००,२६० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. समाधान वडणे आणि डी.बी. पथकाने केली. आरोपींना अटक करून न्यायालयाने थेट जेलवाट दाखवली आहे.

Previous articleपंढरपूर वरून येणाऱ्या वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; ३० वारकरी जखमी….
Next articleचंदनाची वाहतूक करणारी आयशर पोलिसांच्या जाळ्यात; मलकापूर पोलिसांची कार्यवाही !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.