आशाताई बच्छाव
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त ब्राह्मण सेवा मंडळाच्या —
लासलगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात महाअभिषेक संपन्न
आषाढी एकादशी निमित्त भाविकांना खिचडी चे वाटप
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले संत ज्ञानेश्वर मंदिर हे वारकरी परिवाराचे श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशी निमित्त महा अभिषेक महाआरती व भाविकांना खिचडी व उपवास पदार्थ वाटप करण्यात आले. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भास्कर जी शिंदे व सौ कोमलताई शिंदे तसेच नुकतेच वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ विजयजी केंगे व विशाखा केंगे महापूजेचे मानकरी होते.
भक्तिमय वातावरणात ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणी समर्थ रामदास व भगवान परशुराम यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. मैत्रेयी महिला मंडळ हे सातत्याने श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात संस्कारमय भजन ,हनुमान चालीसा, हरिपाठ च्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात. सामाजिक उपक्रमात सीड बॉल बनवणे ,महिला दिन, हळदी कुंकू समारंभ, अर्थ सक्षमीकरणासह बचत गट असे विविध उपक्रम महिला मंडळ राबवते असे मनोगत ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्रेयी मंडळ अध्यक्ष स्मिता ताई कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भास्कर जी शिंदे यांनी मंदिरात आळंदी आणि पंढरपूर अवतरले असे सांगत आज या ठिकाणी महाभिषेकाला बोलावल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत असताना मुलींची सुरक्षा महिलांना सोन्याचे दागिने काळजी व सामाजिक सुरक्षेवर भाष्य केले तर डॉक्टर केंगे यांनी आरोग्याची काळजी व धन्वंतरी पुरस्कारापर्यंतचा प्रवास मांडला. अभिषेकाचे पौरोहित्य युवा अध्यक्ष मयूर भंडारी, योगेश जोशी यांनी केले .ब्राह्मण महासंघ जिल्हा युवा अध्यक्ष गणेश जोशी यांनी ब्राह्मण सेवा मंडळ तसेच युवा मंडळाचे उपक्रम एकीकरणासह सातत्याने मंदिरासाठी होणाऱ्या कामांची मांडणी यावेळी केली. सदरील कार्यक्रम भक्तिमय करण्यासाठी विश्वस्त अध्यक्ष विजय जोशी, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार शेखर कुलकर्णी ,नंदकुमार भंडारी, आतिश कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, संदीप दीक्षित, गिरीश कुलकर्णी, किशोर कुलकर्णी यांच्यासह विशेष ज्यांच्या प्रयत्नातून आजचा आषाढी एकादशी चा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला. असे ईश्वर केंगे ,ऍड प्रथमेश कुलकर्णी, निलेश जगताप, पुजारी सुशील जोशी, गणेश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी,अनमोल योगदानात मैत्रेयी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष प्राजक्ता भंडारी, सह कार्याध्यक्ष रजनी कुलकर्णी, सचिव तृप्ती केंगे, खजिनदार अर्चना कुलकर्णी, संपर्कप्रमुख कल्याणी कुलकर्णी, मार्गदर्शक सुजाता भंडारी ,ज्योती कुलकर्णी ,गायत्री केंगे, संपदा भंडारी, सायली तेंडुलकर, निशिता भंडारी, भाग्यश्री जोशी, स्नेहा जोशी ,सुरेखा जोशी व ज्ञानेश्वरी माऊली परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.






