आशाताई बच्छाव
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, समृध्दी महामार्गामुळे अतोनात नुकसान
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ :-मुंगळा येथील समृद्धी महामार्गाच्या अवाढव्य व नियोजन शुन्य कारभारामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे .
गेल्या 3 वर्षापासून मुंगळा कळमेश्वर रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील शेतकरी वर्गाच्या सोयाबीन पिकातून समृद्धी महामार्गाचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून जात आहे परंतु याकडे प्रशासकीय यंत्रणेचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे व संबंधित ठेकेदार सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे . ठेकेदार ने जेसीबीने खोदकाम करून शेतात जायचे रस्ते बंद करून टाकले आहेत .खोदुन ठेवलेल्या पाटामुळे पाट फुटून गट क्रमांक 223 व 224 या शेतात अक्षरशः नाला पडून शेती खरडून जात आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . त्या संबंधी तहसीलदार यांना आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते . कलेक्टर व मुख्यमंत्री यांस 3 वर्षा पासून ईमेल द्वारे तक्रार देण्यात येत आहेत.तीन वर्षांपूर्वी नायब तहसीलदार वानखेडे साहेब यांनी ठेकदारास सर्विस रोड बद्दल काम चालू करून शेतात शिरणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या होत्या . अद्याप ही सर्विस रोड बनवण्यात आला नाही . Msrdc अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास तुमच्या शेती नजीक गॅस पाइपलाइन गेली आहे त्या मुळे आम्ही काम करू शकत नाही अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली . सर्व्हिस रोड मंजूरी असून सुद्धा अद्याप रोड का करण्यात आला नाही ? शेती समोरील गॅस पाइपलाइन अधिकृत आहे की अनधिकृत ? वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाने या बाबीकडे शेतकऱ्यांच्या समस्यां कडे लक्ष न देत नेमके कोणाला पाठीशी घालत आहे . नुकसानीचे ना पंचनामे झाले ना संबंधित ठेकेदारावर हलगर्जी पण केला म्हणुन कारवाई . अश्या असंख्य प्रश्नाची उत्तरे शेतकरी वर्ग मागत आहे . ढिम्म प्रशासनाचा कारभार , व वरून अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे . समृद्धी महामार्गाचे अपूर्ण काम , ठेकेदाराचा हलगर्जीपणा या मुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.






