Home वाशिम वाशिम जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत

वाशिम जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत

261

आशाताई बच्छाव

1001649062.jpg

वाशिम जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –जिल्हा शिक्षकेतर संघटनेची नव्याने जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली असून त्यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा सचिव रामराव कायंदे कार्याध्यक्ष कैलास ढवळे उपाध्यक्ष विष्णुपंत बाजड तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे जिल्हा अध्यक्ष व सचिव यांची उपस्थिती लाभली. सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव रामराव कायंदे यांनी केले व नवीन जिल्हा कार्यकारिणीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते कैलास ढवळे यांची निवड करण्यात आली तर रामराव कायंदे यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल काळे जिल्हा उपाध्यक्ष आनंद पेंटे जयंत सरनाईक महादेव धुळधुळे सहसचिव निलेश मस्के कोषाध्यक्ष अमोल मोहळे तर जिल्हा संघटक पदावर गजानन इंगोले,कैलास बोरचाटे,संजय लहाने,मनोज चाकोलकर,दत्तात्रय गारुळे,सौ स्मिता इंझाळकर तर प्रसिद्धी प्रमुखपदी ओंकार गिरी यांची निवड झाली.
वरील नवनियुक्त सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून जवळपास २०० शिक्षकेतरांची उपस्थिती होती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पडघान यांनी केले तर आनंद पेंटे यांनी आभार मानले

Previous articleशिक्षण :प्रश्न अनेक – उत्तर एक गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा दिमाखदार उत्साहात संपन्न ! जिल्हा प्रतिनिधी
Next articleवाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, समृध्दी महामार्गामुळे अतोनात नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.