Home नाशिक सौ शलाका कुलकर्णी यांना संस्थेचा समाजक्रांती पुरस्कार जाहीर

सौ शलाका कुलकर्णी यांना संस्थेचा समाजक्रांती पुरस्कार जाहीर

46
0

आशाताई बच्छाव

1001623129.jpg

सौ शलाका कुलकर्णी यांना संस्थेचा समाजक्रांती पुरस्कार जाहीर

अमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

भुसावळ येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच ब्राह्मण महासंघाच्या सदस्या सौ शलाका निलेश कुलकर्णी यांना सामाजिक ,शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमरावती येथील बी एस एफ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने अमरावती येथे होत असलेल्या समाज क्रांती पुरस्कारासाठी निवड केली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार उपेक्षित नायक मुख्य संपादक व अॅडव्होकेट शितल गजभिये यांनी दिली आहे.सामाजिक क्षेत्र , अध्यात्मिक क्षेत्र आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
अमरावती येथे बीएसएफ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा व्यक्तींना सामाजिक क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. अभिनेत्री श्रावणी शिरोळकर, पत्रकार डॉ.शाम जाधव , वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर (वारकरी संप्रदाय ), मनीष मुथा, डॉ.संदीप विनायक काकड, रामचंद्र ताठे, भास्कर सायमन, संदेश जगताप, प्रवीण जाधव, देविदास साळवे, राजू सातपुते, राजनंदिनी अहिरे, सुरेखा गांगुर्डे, रमेश गिरी, अनिल उमाजी म्हस्के, सारंग महाजन, चित्रपट अभिनेता सुरज जाधव, कांचन शिरभे, हभप सविता पारखे , प्रतिभा कांबळे, सावी वासनिक (मॉडेल ), रावसाहेब घोडेराव, योगिता दांडगे , दिलीप शेटे, सचिन बावस्कर, नानासाहेब बच्छाव, वंदना सूर्यवंशी, किरण वाघ पत्रकार बुलढाणा, प्यारेलाल शर्मा, अश्विनी सांगळे, आनंदा राजगुरू व सिद्धार्थ धंदरे, अंजली अहिरे, अरुण महाजन, गोरखनाथ वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

Previous articleखेरवाडी येथे स्व.बाळासाहेब गणपत पाटील आवारे ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
Next articleपावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here