Home अमरावती अमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा

अमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा

42
0

आशाताई बच्छाव

1001613306.jpg

अमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा

चित्रपट दिग्दर्शक,निर्माते, अभिनेते, अभिनेत्री आदींची प्रमुख उपस्थिती

निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे सर यांना ही पुरस्कार

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

अमरावती येथील बी. एस. एफ. बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अमरावती येथे भव्य व दिमाखदार पध्दतीने राजकीय, कृषी, औद्योगिक, सामाजिक, चित्रपट सृष्टी, पत्रकारिता, कला, क्रीडा, कलाकार अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार व शितल गजभिये यांनी दिली आहे.
समाज क्रांती राज्य स्तरीय पुरस्कारासाठी अद्याप पर्यंत अभिनेत्री श्रावणी शिरोळकर, अंजली अहिरे, राजनंदिनी अहिरे, मनिष मुथा, ऍड.भारत गोरवे, अमित अशोक चौहान, सुरेखा गांगुर्डे, पत्रकार रमेश गोसावी,दत्तात्रय आठरे पाटील,अनिल उमाजी मस्के, डॉ संदीप विनायक काकड, पत्रकार सारंग महाजन, अभिनेत्री केतकी गावडे, अभिनेता सुरज जाधव,पत्रकार डॉ.शाम जाधव, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार रामभाऊ आवारे सर, पत्रकार रामचंद्र ताठे, प्रवीण जाधव, देविदास साळवे, कीर्तनकार सविता पारखे, प्रतिभा कांबळे, रावसाहेब घोडेराव, मॉडेल योगिता दांडगे, अभिनेत्री मनाली कांबळे, मुख्याध्यापक आनंदा राजगुरु, एक्टर नंदकुमार निळकंठ, संपादक किरण वाघ मॅडम, मॉडेल सावी वासनिक मुंबई, कवयत्री अश्विनी सांगळे नाशिक, दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा मुंबई, मेकअप आर्टिस्ट वंदना सूर्यवंशी जळगाव, निर्माता नानासाहेब बच्छाव धुळे, सचिन बावस्कर जळगाव ,प्रसिद्ध साहित्यिक दिलीप शेटे अमरावती ,अभिनेत्री कांचन शिरभे जालना आदींना समाज क्रांती पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा अमरावती येथे ५० पुरस्कार प्राप्त व्यक्तींना चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या हस्ते फेटा, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, शाल, मेडल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बी. एस. एफ. बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाज क्रांती पुरस्कार सोहळा हा पहिल्यांदा चा आयोजित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींना हा समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या शीतल गजभिये यांनी दिली. पुरस्कार निवडीसाठी आपण करत असलेल्या क्षेत्रातील आपल्या कार्याची माहिती 9420621994 या व्हाटस अप नंबरवर लवकरात लवकर पाठवावी अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार यांनी दिली.
राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा शानदार पद्धतीने व्हावा यासाठी आयोजक समिती चे भूषण सरदार, गोरखनाथ वाघमारे, पत्रकार रामभाऊ आवारे सर, शैलेश मेश्राम, रॉयल सरदार, आदित्य वानखडे, ललिता वानखडे, राहुल शिंगोले, सौरव शेलारे, डॉ.शाम जाधव,सामाजिक कार्यकर्त्यां राजनंदिनी अहिरे, डॉ. संदीप काकड, अंजली अहिरे , पत्रकार सारंग महाजन प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here