Home जालना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद...

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली :  दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा

145

आशाताई बच्छाव

1001595337.jpg

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा
चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद
सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली :  दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा
जालना, दि. १२(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- निवडणुकीपुर्वी सत्ताधारी पक्षाने राज्यातील
जनतेला अनेक आश्वासने दिली. परंतु निवडणुकीनंतर सत्ता प्राप्त होताच या
सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांकडे त्यांनी स्पशेल
पाठ फिरवल्याने आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने
आश्वासनांबाबत `क्या हुआ तेरा वादा’ अशी आंदोलनांची शृंखला उभी करुन
सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज १२ जुन रोजी याच आंदोलनाच्या
शृंखलेतील जिल्हास्तरीय चक्का जाम आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या नेतृत्वात जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज
उद्यानासमोर करण्यात आले.
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे,
उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, रमेश गव्हाड, भगवानराव कदम, मुरलीधर
शेजुळ,हनुमान धांडे, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे
भरत सांबरे, गणेश काळे,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण,
वैâलास पुंगळे, कुंडलिक मुठ्ठे, देवनाथ जाधव, मुरलीधर थेटे, शहरप्रमुख
बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,दुर्गेश काठोठीवाले, महिला आघाडीच्या मंगल
मेटकर, दिपक रणनवरे, बबनराव खरात, रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, राज्यातील
शेतकरी, कष्टकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. याला शासनाने धोरणं जबाबदार
असून निवडणुक काळात शेतकरी बंधू-भगिनींना मोठ-मोठी आश्वासने देण्यात आली.
त्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा या
आंदोलनांच्या माध्यमातून शासनाला जाब विचारत आहेत.

 

 

 

Previous articleवाशिमच्या शेरी शिवारात विज कोसळून महिलेचा मृत्यू 
Next articleउमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांचा राजीनामा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.