Home उतर महाराष्ट्र मनसे कडून १ मे रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदाराकडून कारवाई नाही

मनसे कडून १ मे रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदाराकडून कारवाई नाही

97
0

आशाताई बच्छाव

1001594176.jpg

मनसे कडून १ मे रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदाराकडून कारवाई नाही

शिरपूर ते शहादा रस्त्याचे काम तात्काळ व्हावे-मनसे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे

(विरदेल / शिंदखेडा प्रतिनिधी)
( राकेश बेहेरे पाटील)

1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदारांना दिले होते निवेदन परंतु तहसीलदारांनी त्या निवेदनावर कुठलीही पद्धत ची कारवाई न करता आत्तापर्यंत व संबंधित अधिकाऱ्यांनी देखील काहीच कारवाई केल्याने त्या साठी 11 जून रोजी शिरपूर ते शाहादा या रस्त्याचे तात्काळ काम सुरू व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिले आम्ही सदर निवेदन हे उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग क्र. १ शिरपूर यांना दिले होते. मात्र त्यांनी सदर रस्ता हा आपल्याकडे वर्ग झालेला असल्याने या रस्त्याबाबत निवेदन तुमच्याकडे करण्याचे लेखी कळविलेले आहे. त्या नुसार खालिल निवेदन आम्ही आपणाकडे देत आहोत. शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झालेली असून आपल्या प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या पुलाजवळ ब.ना. कुभांर गुरुजी हायस्कूल असून शहादा, बोराडी व वाघाडी गावातील जनतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असतांना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे. येथे मोठ-मोठे व खोल खड्डे असल्याने नेमका रस्त्यात खड्डा की, खड्‌ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली असून प्रशासनाचे डोळेझाक व दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. यापुढे या रस्त्यावर व पुलावर होणाऱ्या कोणत्याही अपघातात राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असेल. व महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत आपणास या निवेदानातून सुचित करते की, रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास मनसे स्टाईल खळखट्याळ आंदोलन करेल.
१) रस्त्यात खड्डा की खड्‌ड्यात रस्ता याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग विभाग देणार का ?
२) वाघाडी पुलावर होणाऱ्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग जबाबदार धरण्यात यावे व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावेत
३) वाघाडी पुलावरील रस्त्याचे काम तात्काळ झाल्याच पाहिजनिवेदन यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे, महानगराध्यक्ष बंटी बाबा सोनवणे, मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत, विभाग अध्यक्ष दिनेश कोळी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleअहमदाबाद मध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले
Next articleबच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here