Home जालना अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

115

आशाताई बच्छाव

1001588897.jpg

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: लातुर येथे ८ एप्रिल २०२५ रोजी ११.३६ किलो मेफेड्रोन (एमडी) हा
अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात राजस्व गुप्तचर
संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागाने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला
असून या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून
जालन्याचे अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक यांची नेमणुक करण्यात आली आहे.
ड्रग्ज व्यापारातील प्रमोद संजीव केंद्रे (३५), जुबेर हसन मापक (५२), अहद
शफी मेमन,, मोहम्मद असलम खान, मोहम्मद कलीम शेख, मोहम्मद वसीम शेख (३३),
दिलावर अल्ताफ खान (३४), अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात विशेष
सरकारी वकील अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक हे सर्व सुनावणीत फिर्यादी पक्षाच्या
वतीने हजर राहुन खटल्याचा पाठपुरावा करतील, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व
सीमाशुल्क मंडळाच्या ८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार त्यांच्या
नेमणुकीच्या अटी लागू राहतील. प्रकरणात प्रगती झाल्यास संबंधीत
कार्यालयास माहिती देणे, निकालाची प्रमाणित प्रत पुरवणे, आणि नियुक्ती
संपल्यानंतर सर्व कागदपत्रे परत करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. या
महत्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीबद्दल अ‍ॅड. दीपक
नाईक यांचे अभिनंदन होत आहे.