Home जालना जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड

88

आशाताई बच्छाव

1001571114.jpg

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड
प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिल
कार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची प्रचंड
घोषणाबाजी
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-सत्ता मिळविण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी
निवडणुक  प्रचारात शेतकर्‍यांना अनेक अमिषे दाखविली. मात्र सत्ता मिळताच
शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना
आठवण करुन देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने
`क्या हुआ तेरा वादा’ हे  शेतकरी जनआंदोलन सुरु केले आहे. त्याचा एक भाग
म्हणून जालना जिल्हृयातील सर्व तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकार्‍यांनी एकत्र येवून
जिल्हाधिकारी, तहसिलदार,ग्रामविकास अधिकार्‍यांना निवेदन देवून मागण्या
शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.
आज शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात सत्ताधारी पक्षांच्या वतीने
निवडणुकीच्या काळात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देऊ, शेतकरी सन्मान योजनेतून
प्रति शेतकरी पपंधरा हजार रुपये देऊ, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी
एकवीसशे रुपये मानधन देऊ, राज्यातील ४४ हजार गावात पाणंद रस्ते
बांधू,शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या खतावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत
करू, एक रुपयात पिक विमा देऊ, वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये मानधन
देऊ, अन्नदाता बनेल ऊर्जादाता योजना राबवून शेतीला २४ तास वीज देऊ.
शेतीमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेऊ, हर घर
जल हर घर छत ही योजना राबवू,मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता
घेऊ अशी अनेक मोठ मोठी आश्वासने दिली. सरकार आले की आश्वासनांची पूर्तता
करण्याचा शब्द देण्यात आला होता.

Previous articleराष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
Next articleग्रामपंचायत एकोडी तर्फे पर्यावरण दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.