
आशाताई बच्छाव
विजेच्या कडकडाटात गिर गाईचा मृत्यू: शेतकऱ्याला एक लाख रुपयांचे नुकसान!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा संजय पन्हाळकर
बुलडाणा :-सिंदखेडराजा सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव ब्राह्मण गावातील शेतकरी श्री. संतोष रासमराव देशमुख यांच्या शेतात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात विज कोसळूनत्यांच्या मालकीच्या एक बहुमूल्य दुधाळ गिर गाईचा मृत्यू झाला. ही घटना २७ मे २०२५ रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजता गट नंबर 236 मधील शेतात घडली.
गाईवर विज पडल्याने ती जागीच मृत्यूमुखी पडली. सदर गाईची बाजारातील अंदाजे किंमत ₹१,००,०००/- (एक लाख रुपये) इतकी असून, या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठेi आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी शिवानंद नागरे यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि गावातील पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून नुकसानाची नोंद करण्यात आली आहे. शेतकरी देशमुख यांनी शासनाकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर केला असून, लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
गावकऱ्यांच्या मते, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळत आहे आणि अशा वेळी प्रशासनाने तत्परतेने मदत केली पाहिजे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.