Home पुणे पुणे शहरात आर्थिक तंगीमुळे एकाने व्हिडिओ काँल करुन केली आत्महत्या

पुणे शहरात आर्थिक तंगीमुळे एकाने व्हिडिओ काँल करुन केली आत्महत्या

97

आशाताई बच्छाव

1001545701.jpg

पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ –पोटाच्या भुकेचा बळीमाणसाला लाज-शरम सोडून श्रमाचा मार्ग दाखविते. कधी कोणाला देहविक्रय करायला भाग पाडते तर कधी कोणाला रस्त्यावर भिक्षेकरी म्हणून उभी करते. पोटाच्या भुकेचा बळी पोटाची भूक माणसाला लाज-शरम सोडून श्रमाचा मार्ग दाखविते. कधी कोणाला देहविक्रय करायला भाग पाडते तर कधी कोणाला रस्त्यावर भिक्षेकरी म्हणून उभी करते. कधी अपराध करायला लावते तर कधी थेट आत्महत्या करण्याशिवाय पर्याय सोडत नाही. अशीच पोटाच्या भुकेची विदारकता समोर आणणारी घटना पुण्यात घडली आहे.
तब्बल ११ महीने पगार न झाल्याने नैराश्यामधून कर्मचाऱ्याने केली आत्महत्या, ‘सिंहगड बिझनेस स्कूल’च्या असंवेदनशील कारभारामुळे प्रकार घडल्याचा आरोप; संस्थाचालकाला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी
पोटाची भूक माणसाला लाज-शरम सोडून श्रमाचा मार्ग दाखविते. कधी कोणाला देहविक्रय करायला भाग पाडते तर कधी कोणाला रस्त्यावर भिक्षेकरी म्हणून उभी करते. कधी अपराध करायला लावते तर कधी थेट आत्महत्या करण्याशिवाय पर्याय सोडत नाही. अशीच पोटाच्या भुकेची विदारकता समोर आणणारी घटना पुण्यात घडली आहे. शिक्षणसंस्थेच्या असंवेदनशील कारभाराचा नमूना यानिमित्ताने समोर आला आहे. या संस्थेत काम करणाऱ्या एका विद्युत कर्मचाऱ्याने ११ महिन्यांपासून पगारच न मिळाल्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घडली आहे. ही घटना कोथरूडमधील जयभवानी नगरमध्ये मंगळवारी दुपारी घडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून संस्थाचालकाला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
मनोज भाऊ भगत (वय ३७, रा. जयभवानीनगर, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या ‘इलेक्ट्रीशियन’चे नाव आहे. ते एरंडवणा येथील ‘सिंहगड बिझनेस स्कूल’ या संस्थेत नोकरीस होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाकडून तब्बल अकरा महिन्यांचा पगार त्यांना देण्यात आलेला नव्हता. वारंवार विनंत्या आणि मिनतवाऱ्या करूनही त्यांना पगार मिळालेला नव्हता. त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती.
त्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. मंगळवारी (२७ मे) दुपारी त्यांनी महाविद्यालयाच्या महिला क्लार्कला व्हिडिओ कॉल केला. ‘माझा पगार होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे’ असे सांगून राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला. याबाबत नवनाथ भाऊ भगत (वय ४२) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नवनाथ हे मनोज यांचे भाऊ आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार, मनोज भगत हा सिंहगड बिझनेस स्कुल या महाविद्यालयात मागील १५ वर्षांपासून कामास होता. संस्थेत तो पर्मनंन्ट झाला होता. तक्रारदार नवनाथ यांचे दोन्ही भाऊ गणेश आणि मनोज हे सिंहगड बिझनेस स्कुलमध्ये नोकरीस होते. दोन्ही भावांचा मागील अकरा महिन्यांपासून पगार झालेला नव्हता. त्यामुळे मनोज हे नेहमी ‘टेन्शन’ मध्ये राहू लागले होते. महिनोन् महीने पगार न झाल्याने स्वत:चे व घरखर्चासाठी त्यांनी काही लोकांकडून हातउसने पैसे घेतले होते. या टेन्शनमध्येच त्यांना दारूचे व्यसन देखील लागले. पगार न झाल्यास ‘मी आत्महत्या करेन’ असे ते बोलू लागले. घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे त्यांनी अद्यापपर्यंत टोकाचे पाऊल उचलले नव्हते. याप्रकरणी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीराम डावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
व्हिडिओ कॉल करून केली आत्महत्या
मंगळवारी (२७ मे) दुपारी साडे तीनच्या सुमारास मनोज भगत घराच्या वरच्या मजल्यावर बसला होता. त्यावेळी तो दारू पित होता. त्यावेळी त्याने आई-वडिलांना खालच्या खोलीत बसण्यास सांगितले. सिंहगड बिझनेस स्कूलच्या क्लर्क माधुरी वरगडे यांना व्हिडिओ कॉल केला. गेल्या अकरा महिन्यापासून पगार होत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी वरगडे यांना कळविले. त्यानंतर मनोज यांनी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर माधुरी वरगडे यांनी नथु मारणे यांना याबाबत कळविले. मारणे यांनी गणेश यांना कळविले. त्यानंतर ते तातडीने घरी आले. तेव्हा त्यांना मनोज यांनी फाशी घेतल्याचे आढळले, असे तक्रारीत म्हटले आहे.
अकरा महीने नाही पगार
मनोज भगत यांचे भाऊ गणेश भगत हे सिंहगड संस्थेत सिक्युरीटी गार्ड म्हणून कामास आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून इतर कामगारांसोबतच त्यांचाही पगार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबासमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा कशा भागवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा असे गणेश भगत यांनी सांगितले.
मनोज आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा. सिंहगड संस्थेच्या चालकांनी गेले अकरा महीने पगार न दिल्याने मनोजने असे टोकाचे पाऊल उचलले. अन्यथा असा विचार त्याच्या मनात येणे शक्य नव्हते. पगार झाला नसल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याने तो मानसिक त्रासाला सामोरे जात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली. त्यामुळे संस्थाचालकाला याप्रकरणी जबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. – नवनाथ भगत, मृत मनोज यांचे भाऊ
या प्रकरणात तपास चालू आहे. संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. – संदेश देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे