Home उतर महाराष्ट्र महेश कोल्हे आणि रवी गाढे यांची कबड्डी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण!!!

महेश कोल्हे आणि रवी गाढे यांची कबड्डी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण!!!

96

आशाताई बच्छाव

1001542532.jpg

महेश कोल्हे आणि रवी गाढे यांची कबड्डी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण!!!

श्रीरामपूर(दिपक कदम): टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक रवी गाढे आणि नामवंत कबड्डीपटू महेश कोल्हे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, बेंगळुरू येथे आयोजित सहा आठवड्यांचा कबड्डी सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या कोर्समध्ये आधुनिक प्रशिक्षण तंत्र, खेळातील रणनीती, शारीरिक तंदुरुस्ती,आहार नियोजन, मानसिक तयारी तसेच खेळाडू व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.देशभरातील अनेक प्रशिक्षक आणि खेळाडू या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते.
रवी गाढे आणि महेश कोल्हे यांनी या कोर्समध्ये विशेष कामगिरी केली असून, दोघांनाही संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक भास्करन सर यांचे दोघांनाही मार्गदर्शन लाभले.
रवी गाढे हे आझाद क्रीडा मंडळ, टाकळीभान येथून कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कबड्डीपटूंनी प्रो कबड्डी लीगमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

महेश कोल्हे हे देखील याच मंडळाशी संबंधित असून, प्रशिक्षक म्हणून त्यांची वाटचाल अधिक बळकट होत आहे. त्यांच्या यशाबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती,सहकारी, मित्रपरिवार व चाहत्यांकडून दोघांचेही अभिनंदन केले जात आहे.

Previous articleविस्थापित दुकानदारांचा २ जून रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन
Next articleवंजारवाडी परिसराला वादळाचा तडाखा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.