Home उतर महाराष्ट्र विस्थापित दुकानदारांचा २ जून रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन

विस्थापित दुकानदारांचा २ जून रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन

100

आशाताई बच्छाव

1001542470.jpg

विस्थापित दुकानदारांचा २ जून रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने सोमवार दिनांक २ जून रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर विस्थापित झालेल्या दुकानदारांना त्यांची दुकाने काढले त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी तसेच फक्त ठराविक दुकानदारांवर नगरपालिकेने अन्याय केला याचा जबाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी साहेब जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे तसे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली २९ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या व राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अतिक्रमाने काढण्यात आले आहे त्यात सर्वात मोठी कारवाई फक्त श्रीरामपूर शहरांमध्ये काही ठराविक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे श्रीरामपूर शहरांमध्ये अनेक धन दांडगे लोकांचे मोठ्या प्रमाणातअतिक्रमण आहे त्या लोकांच्या अतिक्रमणाकडं कानाडोळा करून श्रीरामपूर नगरपालिकेने गोरगरिबांच्या दुकानावर बुलडोझर फिरवून त्यांच्या दुकानाची व संसाराची राख रांगोळी करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे अतिक्रमण काढत असताना श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने दुजाभाव करून फक्त गोरगरिबांचे बेलापूर रोड गोंधवणी पोलीस स्टेशन तसेच भाजी मार्केट रोड नेवासा रोड या ठिकाणचे अतिक्रमण काढून त्या दुकानदारावर श्रीरामपूर नगरपालिकेने अन्याय करून उर्वरित श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणना अभय दिला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी व आमचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन होईपर्यंत पुन्हा दुकाने चालू करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने परवानगी द्यावी नाहीतर आम्हाला जो नियम लावला तो नियम श्रीरामपूर शहरातील सर्व अतिक्रमण केलेल्या लोकांना लावण्यात यावा या मागणी सोमवार दिनांक २ जून रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिका समोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनाला विस्थापित दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन तसेच मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी केले आहे कार्यक्रमासाठी किशोर ओझा फयाज पठाण कैलास बाविस्कर अविनाश सुपेकर अझरुद्दीन अत्तार अक्षय गवळी रवी चव्हाण राकेश थोरात जुनेद मलिक सुनील दंडवते श्रीकृष्ण लावर अशोक लोणकर तरन्नुम शेख अश्फाक अत्तार अदनान मलिक जावेद अख्तर संदीप भावसार ऋषिकेश कासलीवाल अक्षय निकुंभ प्रदीप निकुंभ अरुण जयसिंग जयसिंग देवकाते मन्सूर बागवान आतिश बाविस्कर रमेश श्रीवास्तव गणेश कुवर सतीश चव्हाण गणेश पवार विकी चव्हाण रामू पवार किशोर कंट्रोल हरी शिरसागर बिलाल अत्तर असिफ मणियार वणेश कुवर सरदार आत्तार वसीम बागवान सलीम बागवान इम्रान बागवान आसिफ बागवान शाहिद बागवान आदी मोठ्या संख्येने विस्थापित व्यापारी उपस्थित होते

Previous articleस्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ. .. . .. … … .
Next articleमहेश कोल्हे आणि रवी गाढे यांची कबड्डी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण!!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.