आशाताई बच्छाव
भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत कार्यकर्ते बापू खलाणेंची नियुक्ती
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत पदाधिकारी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे जि.प. चे माजी कृषी सभापती बापू खलाणे यांची भाजपा धुळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बापू खलाणे हे ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीयपणे कार्यरत आहेत. तसेच त्यांचा ग्रामीण जनतेशी मोठा संपर्क असून सर्वत्र परिचित असे व्यक्तिमत्व आहे. भाजपा नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा पणन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार प्रदेश भाजपातर्फे आ. चैनसुख संचेती प्रदेश निवडणूक अधिकारी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीबद्दल ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, धुळे शहराचे आ. अनुप अग्रवाल, शिरपुरचे आ. काशिराम पावरा, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, जि.प. चे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, धुळे लोकसभा प्रमुख नारायण भाऊसाहेब पाटील तसेच जिल्ह्यातील समस्त भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. तसेच बापू खलाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल एका सर्वसामान्य जुन्या कार्यकर्त्याला न्याय, अशी भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे.