Home बुलढाणा मोठी बातमी ! उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर विरुद्ध गुन्हा दाखल ! राष्ट्रध्वज...

मोठी बातमी ! उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर विरुद्ध गुन्हा दाखल ! राष्ट्रध्वज उलटा फडकवला… समजावणा ऱ्याला केली दमदाटी?

25
0

आशाताई बच्छाव

1001509998.jpg

मोठी बातमी ! उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर विरुद्ध गुन्हा दाखल ! राष्ट्रध्वज उलटा फडकवला… समजावणा ऱ्याला केली दमदाटी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर बुलडाणा :- अमडापूर उदयनगरचे सरपंच मनोज लाऊडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज नियमानुसार न फडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काल, १४ मे रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..मनोज लाहुडकर उदयनगरचे सरपंच असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत. महाराष्ट्र दिनी उदयनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज नियमानुसार न फडकवता हिरवा रंग वर आणि केशरी पत्ता खाली अशा पद्धतीने उलटा फडकवला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देखील दिली नसल्याने
मानवंदना देखील दिली नसल्याने तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय समजावण्यासाठी गेलेल्यांना देखील दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बोरगाव काकडे येथील सतीश रामेश्वर काकडे (३४) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. राष्ट्रध्वज अपमान प्रतिबंधक अधिनियम १७१ नुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. ठाकूर करीत आहेत..

Previous articleBREAKING आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल ! तलवार फिरवणे अंगलट
Next articleडॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या आठ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here