Home बुलढाणा BREAKING आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल ! तलवार फिरवणे अंगलट

BREAKING आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल ! तलवार फिरवणे अंगलट

26
0

आशाताई बच्छाव

1001509990.jpg

BREAKING आमदार सिद्धार्थ खरातांवर गुन्हा दाखल ! तलवार फिरवणे अंगलट
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा अमडापूर मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. खरात यांनी एका लग्नाच्या वरातीत तलवार फिरवली होती. आर्म ऍक्ट या नुसार सदरचा प्रकार गुन्हा आहे. खरात यांचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, बुलडाणा लाइव्ह ने त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काल, १४ मे च्या रात्री सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आमदार खरात यांच्यासह त्यांच्या हाती तलवार देणाऱ्या उकळी सुकळी येथील अनिल यादवराव मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आला आहे.

अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत एका लग्नाच्या वरातीत सिद्धार्थ खरात यांनी नाचतांना तलवार फिरवली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेत आमदार खरात यांच्यावर गुन्हा दाखल केला.. स्वतःच पोलिसांनीच या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. आता आमदार खरात यांनी फिरवलेली तलवार जप्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.. तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here