आशाताई बच्छाव
मेहकर तालुक्याला अवकाळीने झोडपले; विजांचेही तांडव ! झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली; जागीच मृत्यू ! चायगावची घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मेहकर नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने काल, १४ मे साठी बुलढाणा जिल्ह्याला ऑरेंज साठी बुलढाणा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाट होईल असे अंदाजात म्हटले होते. हा अंदाज खरा ठरला. मेहकर तालुक्यातील नायगाव, दत्तपूर, जानेफळ भागात काल दुपारी तुफान वादळ आले. विजांच्या तांडावर एका शेतकऱ्यावर वीज
कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना चायगाव येथे घडली. अर्जुन कुंडलिक रोही (७५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे..
अर्जुन रोही पत्नीसह शेतात होते. वादळी वारा आणि पाऊस सुरू झाल्याने ते आंब्याच्या झाडाखाली थांबले. त्यावेळी झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली बसलेल्या अर्जुन रोही यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतक अर्जुन रोही यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काल झालेल्या वादळी पावसाने परिसरात लग्न मंडपांची देखील दाणादाण उडाली. उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले..