आशाताई बच्छाव
शिर्डी/ लूटमार करणाऱ्या तोतया पोलिसाला ! शिर्डी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे. अशी खोटी बतावणी करून तुमचे पैसे, सोने येथून चोरीस जाईल ते खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असे बोलून फसवणूक करणारा व अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीस शिर्डी पोलिसांनी केले मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
आज दिनांक 16/05/2025 रोजी सकाळी 10:00 वा. श्री रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन याना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली होती .की खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी अशी बतावणी करून तुमचे पैसे सोने चोरी जातील व तुमच्या खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असे सांगून फसवणूक करणारा आरोपी/इसम हा 500 रूम आश्रम शिर्डी परिसरात पल्सर मोटर सायकल वर फिरत आहेत .अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे यांच्यासह आदी पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन सदर आरोपीचा परिसरात शोध घेऊन त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंग झडती केली . तसेच त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान राहणार वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर असे सांगितले. त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशन 2 गुन्हे, कोपरगाव पोलीस स्टेशन 2 गुन्हे, पुणे येथील अलंकार, चतूशृंगी,शिरूर, कोरेगाव, वानवडी ई. पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी 1-1 गुन्हा दाखल असून सदरची कामगिरी हि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री रणजित गलांडे ,पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. सदर आरोपी यास लोणी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांचे ताब्यात दिले आहे.