Home बुलढाणा वाळू माफियाची दादागिरी! तहसीलदार यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी! तामगाव...

वाळू माफियाची दादागिरी! तहसीलदार यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी! तामगाव पो.स्टेशन येथे गुन्हा दाखल

133

आशाताई बच्छाव

1001502913.jpg

वाळू माफियाची दादागिरी! तहसीलदार यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी! तामगाव पो.स्टेशन येथे गुन्हा दाखल
सहसंपादक युवा मराठा स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :- संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू तस्करी जोरात सुरु आहे. त्याला आळा घालण्यासाठी तहसीलदार आपल्या पद्धतीने कामे करत आहेत. मात्र दि.१२ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ग्राम भोन जवळील पुर्णा नदीचे पात्रात अवैध रेती उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी महसुल पथक प्रदीप सुभाष नलावडे, ग्राम महसुल अधिकारी, अशिष खुशाल सेवेकर ग्राम महसुल अधिकारी, अविनाश रतन खरे ग्राम महसुल अधिकारी, गौरव रविद्र पाटील ग्राम महसुल अधिकारी, ग्राम पंचायत भोन शिपाई सुरेश आनंदा वानखडे, ग्राम भोन येथील सरपंच श्रीकृष्ण विश्वनाथ तराळे यांच्यासह नदी पात्रात गेले. नदी पात्रात फेर फटका मारत असतांना एक ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या पथकाला पाहुन पळुन जाण्यास यशस्वी झाला. तसेच त्या ठिकाणी तीन ईसम संशयास्पद रित्या वाळुच्या ढिगाऱ्या जवळ हातात टोपले आणि फावडे घेवुन आढळून आले. त्यांचे कडे एक दोनचाकी वाहन हिरो स्प्लेंडर एम.एच २८ बी.एक्स ७२६६ उभी होती. तहसीलदार प्रशांत पाटील त्यांना नाव विचारले असता त्यामधील दोघांनी त्यांचे नाव सागर उमाळे व नामदेव थारकर दोन्ही रा. पहुरपुर्णा असे सांगीतले. तिस-या ईसमास त्याचे नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. त्यांना एवढ्या रात्री नदी पात्रात काय करता असे विचारले असता सागर उमाळे याने अश्लील शिवीगाळ करत नदी काय तुमच्या बापाची आहे काय?तुम्ही नदीत कसे काय आले आम्ही शेगांव कडे रेती वाहतुक करतो आमचा संग्रामपुरचा काहीही संबंध नाही असे सांगितले. तसेच नामदेव थारकर याने सुद्धा शिवीगाळ करत दम असेल तर १० मीनीट येथेच थांबा तुम्हाला विना नंबरचे वाहनाने चिरडतो. तुमच्यावर खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो अशी धमकी देवुन दोनचाकी गाडीवर निघुन गेले. तरी यातील सागर उमाळे व नामदेव थारकर दोन्ही रा.पहरपुर्णा व एक अनोळखी इसम यांनी तहसीलदार व महसुल पथकातील कर्मचारी यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवाने मारण्याची व खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो. असे धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. त्या प्रकरणी तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तामगाव पो.स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार २९६, २२१, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामगाव पोलीस करत आहे.

Previous articleआदर्श विद्या मंदिर शाळेचा ८७.३६% निकाल     
Next articleमहाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा अमरावती करांचाभाग्य, भूषण गवई आज होणार देशाचे सरन्यायाधीश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.